ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हिंदू जनजागृती समितीने केला ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचा प्रसिद्धीपत्राद्वारे निषेध ..!

हिंदू जनजागृती समितीने केला ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचा प्रसिद्धीपत्राद्वारे निषेध ..!

प्रकाशन: 22 Oct 2021 05:16 PM
वाचन संख्या 58

स्वातंत्रवीर सावरकरांचा घोर अपमान झाल्याचा प्रसिद्धीपत्रकाचा आरोप व आशय..!

कणकवली | उमेश परब : “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणार्‍या काँग्रेसच्या उर्जामंत्री नितीन राऊत यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. वीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट काढले; मात्र आज त्यांच्याच पक्षाचे मंत्री हे त्यावर टिप्पणी करून आपल्या नेत्यांचा अपमान करत आहेत. जर इंदिरा गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्यापेक्षा माकडाच्या तिकिटाची किंमत अधिक ठेवली, असे मंत्री महोदयांना म्हणायचे असेल, तर काँग्रेसी संस्कृतीत आज देशभक्तांपेक्षा मर्कट उड्या मारणार्‍यांना अधिक महत्त्व का आले आहे, हे त्यातून लक्षात येते. माननीय मंत्रीमहोदय, एखाद्या टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसते, याचे भान ठेवावे”, असे हिंदु जनजागृती समितीने एका पत्रकाद्वारे  म्हटले आहे.                              “राष्ट्रभक्तांची किंमत जर टपाल तिकिटांवर ठरवायची झाली, तर गांधीजींच्या टपाल तिकिटाची किंमत दीड आणा म्हणजे 9 पैसे; मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, कस्तुरबा गांधी यांच्या टपाल तिकिटांची किंमत 15 पैसे आहे. त्या तुलनेत स्वा. सावरकरांच्या टपाल तिकिटांची किंमत http://localhost/news/public/uploads/20 पैसे आहे. यातून स्वा. सावरकर यांची किंमत तत्कालीन काँग्रेसी नेत्यांपेक्षा अधिकच आहे. स्वा. सावरकरांची तुलना माकडाशी करणार्‍या उर्जामंत्र्यांनी एकप्रकारे गांधी-नेहरूंच्या तिकिटांचीही तुलना माकडाशी केली आहे, हे त्यांच्या लक्षात येत आहे का ? देशासाठी फार काही जमत नसेल, तर किमान स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आपल्या थोर क्रांतीकारकांचा आदर राखण्याएवढे सौजन्य तरी काँग्रेसी नेत्यांमध्ये असले पाहिजे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध ठाम राहून स्वा. सावरकर अंदमानात शिक्षा भोगण्यासाठी गेले, मात्र येथे मंत्री महोदय स्वतःच्या फेसबुक पोस्ट विषयीही ठाम रहाण्याचे धाडस दाखवत नाहीत. त्यामुळेच त्यांनी ती पोस्ट लगेच डिलीट करून पळ काढला. मग कोण पळपुटे निघाले ?”असा सवालही हिंदु जनजागृती समितीने उपस्थित केला आहे.
हे प्रसिद्धीपत्रक हिंदू जनजागरण समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री.रमेश शिंदे यांच्याद्वारा प्रसिद्ध केले गेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स