ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळशी हायस्कूलला माजी विद्यार्थ्याकडून ३० खुर्च्यांची देणगी.

साळशी हायस्कूलला माजी विद्यार्थ्याकडून ३० खुर्च्यांची देणगी.

प्रकाशन: 27 Sep 2024 02:17 AM
वाचन संख्या 92

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर तथा साळशी हायस्कूलच्या एस. एस. सी. मार्च २००३ च्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेस सुमारे १२ हजार रुपये किंमतीच्या ३० प्लॅस्टिक खुर्च्या देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आल्या. हा खुर्च्या प्रदानाचा कार्यक्रम प्रशालेत संपन्न झाला. यावेळी सन- २००३ च्या माजी विद्यार्थ्यांनी – ३० प्लास्टिक खुर्च्या प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांच्याकडे सुपूर्द केल्या .यावेळी माजी विद्यार्थी निलेश लाड यांने मनोगत व्यक्त केले.

सहा. शिक्षक संजय मराठे व पुरुषोत्तम साटम यांनी ही माजी विद्यार्थ्यांच्या या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले. प्रशालेचे मुख्या‌ध्यापक माणिक वंजारे यांनी सन २००३ च्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक केले. गांवच्या ठिकाणी राहून आपल्या तुटपुंज्या आर्थिक प्राप्तीतून आपल्या प्रशालेसाठी कांही तरी करण्याची हे धडपड करतात, ही त्यांची शाळेविषयी आस्था पाहून त्यांचा अभिमान वाटतो. असे कौतुकोदगार काढले. त्यांच्या या कार्याबद्दल प्रशाला, संस्था, शिक्षक या सर्वांच्या वतीने या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून सर्वांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाच्या शेवटी स्वप्नील भरणकर यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रम समारोप केला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले.

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी- निलेश लाड, सौ. श्रेया धुळप, उमेश नाईक, कृष्णा सावंत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, सहा.शिक्षक संजय मराठे , पुरुषोत्तम साटम व स्वप्नील भरणकर, भिसे व प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स