मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची दिवंगत प्रीती केळुसकर यांना श्रद्धांजली.
मालवणमधील एकत्रित आलेल्या महिलांच्या मनोधैर्याला सक्षम सामाजिक सहकार्य लाभत रहायचा विश्वास.
मुंबई | प्रतिनिधी : मानवता विकास परीषदे व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे जळून दुर्देवी अंत झालेल्या प्रीती केळुसकर यांना प्रसिद्धी संदेशाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे घडलेल्या घटनेचा निषेध शब्दांमधून व अश्रूंमधून करणे अशक्य आहे असे त्यांनी प्रसिद्धी संदेशात नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कृपा आशिर्वाद तसेच त्यांचा पदस्पर्शही लाभलेल्या आणि अत्यंत सुसंस्कृत व शालिन परंपरा लाभलेल्या मालवण शहरामध्ये अशी घटना घडू शकेल यांवर आधी विश्वासच बसत नाही असे श्रीकांत सावंत यांनी सांगितले आहे. संबंधित संशयिताला कठोर व तत्काळ शासन होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर मालवणातील महिलांनी एकत्रित येत प्रशासनाला जे निवेदन दिले आहे त्याबद्दल श्रीकांत सावंत म्हणतात की दिवंगत प्रीती केळुसकर यांचे हे बलिदान हे मालवणातील महिलेचे पहिले व शेवटचे असे सांगत नारीशक्तीचा एकत्रित जागर केलेल्या सर्व महिलांच्या मनोधैर्याला समाज सक्षमपणे सहकार्य करेलच हा विश्वास आहे. मालवणातील महिलांनी एकत्र येत त्यांचा आवाज बुलंद करत असामाजीक वृत्तींना व व्यक्तिंना जाहीर इशारा दिल्याचेही मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)