ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात राष्ट्रीय स्‍वैच्छिक रक्तदान दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आणि आदर्श रक्तदाता सोहळा.

मालवणात राष्ट्रीय स्‍वैच्छिक रक्तदान दिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आणि आदर्श रक्तदाता सोहळा.

प्रकाशन: 25 Sep 2024 11:38 AM
वाचन संख्या 126

देहदान व नेत्रदान विषयक माहिती आणि नोंदणी मोहीमेचा विशेष कार्यक्रम.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात, राष्ट्रीय स्‍वैच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते, मालवण यांच्यावतीने मंगळवार १ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबीर व आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळा तसेच देहदान आणि नेत्रदान संकल्प मोहीम असे उपक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. डॉ. विदयाधर तायशेट्ये, फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बाॅडी डोनेशन’ चे प्रमुख समन्वयक यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. मंगळवारी १ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ०० ते २. ०० दरम्यान मामा वरेरकर सभागृह मालवण येथे हे उपक्रम संपन्न होतील.

देहदान आणि नेत्रदान संकल्प मोहीम मार्गदर्शन व नाव नोंदणी यासाठी डॉ. श्री. प्रमोद विनायक लिमये. (जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे ३५ वर्षे आरोग्य विभाग येथे सेवा निवृत्त देहदान अवयव दान कार्यक्रमात गेली ७ वर्षे कार्यरत.) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

देहदान, नेत्रदान यांच्या नोंदणी फाॅर्मसाठी इच्छुकांनी आपले आधारकार्ड घेऊन येणे आणि आरोग्य कार्यात सहभागी होण्याचे आवाहन लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण, ग्लोबल रक्तदाते गोवा, ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स