मालवणात महिलेवर पेट्रोल ओतून जाळायचा प्रयत्न.
एस टी स्टॅन्ड समोरील एका आस्थापनात काम करणारी महिला.
मालवण | ब्युरो न्यूज : मालवण बस स्थानकासमोर वैद्यकीय परीक्षण आस्थापनात काम करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडल्याने प्रचंड खळबळ झाली आहे. आज दुपारी पावणे तीन वाजण्याच्या ही सुमारास घडली आहे.
बस स्थानक परिसरातील जागरुक नागरिकांनी या महिलेच्या अंगावरील आग विझवून तिला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मालवण पोलिसांनी रुग्णालयात येऊन माहिती घेतली आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)