ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हास्तरीय थ्रो - बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलचे वर्चस्व.

जिल्हास्तरीय थ्रो - बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कूलचे वर्चस्व.

प्रकाशन: 24 Sep 2024 11:58 PM
वाचन संख्या 100

बांदा | राकेश परब : तुळसुली येथे खेळवल्या गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय थ्रो – बॉल स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलगे व मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवून सलग दुसऱ्या वर्षी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आणि विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र ठरल. १७ वर्षे वयोगटातील मुलगे व मुली दोन्ही संघ उपविजेते ठरले. या विजयामुळे सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक महेश नाईक व मुख्याध्यापिका सायली परब यांचे अभिनंदन होत आहे.

मुलींच्या संघामध्ये अलिषा गावडे, आर्या गवस, उर्वशी शेर्लेकर, क्लेरिसा राॅड्रिक्स, चैत्रा नाईक, तपस्या धुरी, दृष्टी सातार्डेकर, पलक गावडे, प्रियांका तूयेकर, सानिका गावडे, स्नेहा केरकर, हर्षदा नाईक, निधी किडजी, श्रेया गावडे तर मुलांच्या संघांमध्ये चिन्मय नाईक, कृष्णा गावडे, गोविंद राणे, महादेव सावंत, यथार्थ पंडित, यशदीप गावडे, रमेश परब, रोहित केणी, लक्ष सामंत, विश्राम परब, सोहम् पाडलोस्कर, सहदेव पडलोसकर,वेदांत गावडे या सर्व विजयी खेळाडूनी न्यू इंग्लिश स्कूलच्या यशात योगदान दिले.

या यशस्वी खेळाडू विद्यार्थी विद्यार्थीनींचे संस्थेचे कार्याध्यक्ष, सचिव व सर्व कार्यकारीनी सदस्य, शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स