किर्लोसच्या छत्रपती शिवाजी कृषीविद्यालयात जनावरांच्या लसिकरणाविषयी झाले मार्गदर्शन..!
कृषीकन्या गौतमी तळगांवकर यांनी शेतकऱ्यांना दिली माहिती…!
ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस- ओरोस यांच्यावतीने ग्रामीण उद्योजक जागरुकता विकास योजनेच्या अंतर्गत तळगाव येथे “जनावरांना लसीकरणाचा फायदा” याबाबत कृषिकन्या गौतमी तळगावकर हिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस यांचे छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस यांच्या वतीने ग्रामीण उद्योजक जागरुकता विकास योजनेअंतर्गत महाविद्यालयाची कृषिकन्या गौतमी तळगावकर हिने मालवण तालुक्यातील तळगाव येथील शेतकऱ्यांना “जनावराना लसिकरनाची आवश्यकता का आहे आणि त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गौतमी तळगावकर हिने जनावराना लसीकरण मोहीम आयोजित करून जमलेल्या शेतकऱ्यांना जनावराना लशिकरण केल्याने जनावरांची रोग प्रतिकार शक्ति वाढते . कोणताही रोग होण्याची शक्यता लसिकरणाने कमी होते . बहुतेक गावांमध्ये जनावरांच्या लसिकरणाकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे अश्या गावामध्ये जणांवरे रोगाला बळी पडतात . असे सांगतानाच जनावरांचे रोग आणि त्यांची लक्षणे याबाबतची माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी पशुवैद्य डॉ.माळवे यांनी जनावराना लशिकरण केले. या लशिकरण मोहिमेसाठी कृषी कन्येला संस्थेचे चेअरमन ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्राचार्य योगेश जंगले, प्राचार्य डॉ. सोनाली पावसकर, प्राध्यापक विवेक खरात संकेत राहाटे, स्नेहा सामंत ,विघ्नेश सकपाळ, गोपाळ गायकी, आदींचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. जनावरांचे रोग आणि लशिकरण याबाबत दिलेल्या माहिती बाबत उपस्थित शेतकऱ्यानी समाधान व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)