ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्राथमिक शिक्षक भारती २९ ऑक्टोबरला छेडणार आंदोलन

प्राथमिक शिक्षक भारती २९ ऑक्टोबरला छेडणार आंदोलन

प्रकाशन: 22 Oct 2021 01:48 PM
वाचन संख्या 64

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत मा .शिक्षणाधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांच्याशी वेळोवेळी निवेदने व चर्चा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत . भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही काही प्रश्नाची अद्यापही सोडवणूक झालेली नाही . शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे अशी धारणा झालेली असून या प्रलंबित प्रश्नांची उकल लवकरात लवकर होण्यासाठी व शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समोर शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत कोविड नियमांचे व शासन निर्बंधाचे काटेकोर पणे पालन करून एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
शैक्षणिक कामकाजासाठी कोविड ड्युटीतून शिक्षकांना कार्यमुक्त करणे,सातत्याने विलंबाने होत असलेल्या पगारा बाबत,आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करणे ,cmp प्रणालीद्वारे प्राथमिक शिक्षकांचे पगार करणे बाबत, शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर करणे,अंशदान हिशोब तक्त्यातील तफावत दूर करणे व dcps कपात रक्कम व सहाव्या वेतन आयोगातील हप्ते भविष्य निर्वाह खाती वर्ग करणे,अभावीत पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया त्वरित राबवण्यात येऊन पदवीधर,केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे त्वरित भरणे
( विशेष अनुमती याचिका क्र . २८३०६/२०१७ मधील मा . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून पदानोत्तीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार तात्काळ भरण्याबाबत ),अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे बाबत ,वेतन निश्चितीमधील त्रुटी दूर करून प्रस्ताव मंजूर करणे बाबत,समग्र शिक्षा अभियानातून विशेष दुरुस्ती अनुदान मंजूर केलेल्या शाळांना दुसरा हप्ता व दुरुस्ती पूर्ण झालेल्या शाळांना अंतिम हप्ता विनाविलंब मिळावा ,माध्यमिककडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या शिक्षकांच्या dcps कपाती बाबत,खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जि.प. स्वनिधीतून गणवेश पुरवणे,शासनाच्या नवीन बदली धोरणानुसार करण्यात आलेल्या सुगम व दुर्गम क्षेत्रात येणाऱ्या शाळांची नव्याने यादी प्रसिद्ध करणे इत्यादी प्रलंबित प्रश्र्नांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे व सचिव अरुण पवार यांनी दिली

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स