ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत आणि निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन करणे बंधनकारक.
ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत आणि निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन करणे बंधनकारक.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : 'ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000' तसेच पर्यावरण विभागाच्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०२६ मध्ये सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत देण्याबाबत जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यापूर्वी दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आदेश जाहीर केले आहेत.
यानुसार सप्टेंबर महिन्यात दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी गोपाळकाला / दहीहंडी, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश उत्सव (पाचवा दिवस), दि. २० सप्टेंबर २०२६ गणेश उत्सव (सातवा दिवस), दि. २५ सप्टेंबर २०२६ अनंत चतुर्दशी या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे.
ध्वनीक्षेपकाचा वापर करताना निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून, उच्च न्यायालयाच्या आदेशांचे किंवा ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात.
विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त ...
कै. डॉ. अरविंद खानोलकर यांच्या श्रद्धांजली सभेद्वारा 'सेवा करा, पण तिचा गाजावाजा करू नका' शिकवणुकीला उजाळा देऊया...!
मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण शिबीर संपन्न.
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या