ताज्या बातम्या
पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश. रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी. मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात. देवीशक्तीच्या उपासनेला सामाजिक जाणीवेची जोड देऊ पहाणारा जिल्हा प्रशासनाचा ‘नवदुर्गा’ उपक्रम. कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड. दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन. मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू.
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी अग्रिम पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती


Article image


शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचेही मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण.


मुंबई | ब्यूरो न्यूज : राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीपूर्वी दिलासा म्हणून त्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचा अग्रीम जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज १४ ऑक्टोबर २०२६ रोजी येथे सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. 


शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये, अशी सक्ती ताकीद संबंधित सोसायट्यांपासून, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याच्या अवैध उपश्यावर कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचे आणि त्यासाठी सोळा हजार वीज जोडण्या तोडण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

 

राज्यात यापुर्वीच २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये आता आणखी ४० तालुक्यांचा समावेश करण्यात येत आहे. आता दुष्काळी तालुक्यांची संख्या ३०५ इतकी झाली आहे. या तालुक्यांमध्ये आता दुष्काळी उपाय योजना करण्यास प्राधन्य देण्यात येणार आहे. यापूर्वीच्या समाविष्ट तालुक्यांध्ये दुष्काकाळाबाबत ट्रिगर एक लागू केला होता. आता नव्याने समाविष्ट तालुक्यांसह, या तालुक्यांमध्ये ट्रिगर लागू करण्याबाबतची कार्यवाहीला गती देण्यात येत आहे. 


दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.


जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत उपाययोजनांची चर्चा करण्यात आली. तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. जिथे पाणी आहे, तिथे चाऱ्यांसाठीच्या पिकांची लागवड करण्यात यावी. तसेच रब्बीमध्येही ज्वारीसारख्या चारा देणारी पिके घेण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांकडून लागवड करण्यात आलेल्या चाऱ्याची शासन हमी भावाने खरेदी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीज पुरवठा मोफतच आहे. यातूनही वीज बिलासाठी कुणी तगादा लावत असेल, तर त्यांना तसे न करण्याबात सक्त सूचना देण्यात येतील. कर्ज वसुलीसाठीही शेतकऱ्यांना तगादा लावू नये, असे निर्देश सोसायट्या आणि जिल्हा बँकांना देण्यात आल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांवरही लक्ष ठेवण्यात येत असून, त्यांनीही आततायी पणा करू नये असा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत

लोकप्रिय टॅग्स

ताज्या बातम्या