ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला किर्लोस कृषी विद्यार्थिनींची भेट.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला किर्लोस कृषी विद्यार्थिनींची भेट.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला किर्लोस कृषी विद्यार्थिनींची भेट.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला भेट देऊन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्ज योजनांचा व कर्ज प्रक्रियेचा अभ्यास केला.


या भेटीदरम्यान शाखा व्यवस्थापक एस. एल. ठाकू यांनी कृषी विद्यार्थिनींना शेतकऱ्यांना दिली जाणारी विविध प्रकारची कर्जे, कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज मंजुरीची प्रक्रिया तसेच कर्जाचा योग्य वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या माध्यमातून विद्यार्थिनींना शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा व बँकेमार्फत मिळणाऱ्या कृषी कर्ज सुविधांची प्रत्यक्ष माहिती मिळाली.


या भेटीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भेंडे, उपप्राचार्य लेफ्टनंट विवेक राणे आणि शिक्षण विभाग प्रमुख विवेक खरात यांचे मार्गदर्शन लाभले. या शैक्षणिक भेटीमुळे कृषी विद्यार्थिनींना बँकिंग व्यवस्था व शेतकऱ्यांसाठीच्या कर्ज सुविधांची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स