पोईप येथे वेलांकणी मातेचा उत्सव भक्तीपूर्ण उत्साहात संपन्न..!
मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पोईप येथील वेलांकणी चॅपेल मध्ये वेलांकणी मातेचा उत्सव नुकताच भक्तीपूर्ण उत्साहात साजरा करण्यात आला. पोईप येथील ख्रिस्ती बांधवांनी नऊ दिवस नोवेना केली. यात सर्व समाजातील तसेच वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना केली गेली. या सणासाठी प्रमुख मसुरे पॅरीशचे फादर गिलबर्ट, चिंदर गावचे फादर सॅबी, माणगावचे फादर विल्यम वरळीकर आणि फादर फ्रँकलीन यांनी उपस्थित राहून येथील उपस्थित ख्रिस्ती बांधवांना धार्मिक विषयांवर मार्गदर्शन केले.
मसुरे चर्चच्या सिस्टर यांनी वेलांकणी मातेची मूर्ती घेऊन सर्व खिस्ती बाधवांच्या उपस्थितीत पोईप बाजार पेठ येथे शांतता फेरी काढली. तसेच या सणासाठी मसुरे, कसाल, चिंदर, वेरली, या गावातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकोलस लोबो यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)