ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खरारे - पेंडूर येथे कृषी दिन शेतकरी मेळावा संपन्न.

खरारे - पेंडूर येथे कृषी दिन शेतकरी मेळावा संपन्न.

प्रकाशन: 01 Jul 2025 09:41 PM
वाचन संख्या 89

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व ग्रामपंचायत खरारे-पेंडूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिन – शेतकरी मेळावा मंगळवार, १ जुलै रोजी ग्रामपंचायत खरारे-पेंडूर सभागृह येथे संपन्न झाला.

या मेळाव्याच्या पूर्वी न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर ते ग्रामपंचायत अशी शालेय मुलांची वृक्ष दिंडी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांसमवेत गटविकास अधिकारी श्याम चव्हाण व इतर प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, पालक, शेतकरी सहभागी झाले होते. पेंडूर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात श्याम चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. खरारे पेंडूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वसंतराव नाईक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी अमोल करंदीकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. तुषार वेर्लेकर, सरपंच सौ. नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, प्रगतशील आंबा व्यावसायिक डॉ. उत्तम फोंडेकर, किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विकास धामापूरकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, कृषी विस्तार अधिकारी सुनील चव्हाण, विस्तार अधिकारी आत्माराम परब, विस्तार अधिकारी श्रीकृष्ण सावंत, आरोग्य पर्यवेक्षक राजेंद्र रणसिंग आदी उपस्थित होते.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांनी प्रास्ताविक केले. शेतीमध्ये उत्तम व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना दूध किटलीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. उत्तम फोंडेकर, शास्त्रज्ञ विकास धामापूरकर, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, डॉ. वेर्लेकर, धंनजय गावडे, अजिंक्य पाताडे, नेहा परब यांनी मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ग्रा. पं. सदस्या सौ. वैष्णवी लाड यांनी केले. यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, पेंडूर ग्रा. पं. अधिकारी शुभदा कोठावले, आचरा मंडळ कृषी अधिकारी हुसेन आंबडकर, पेंडुर सहाय्यक कृषी अधिकारी व्ही. आर. कुबल, प्रभारी कृषी मंडळ अधिकारी दशरथ सावंत, ग्रा. पं. सदस्य सौ. समृद्धी सरमळकर, अंकिता सावंत, अश्विनी पेडणेकर, पं. स. डीईओ यु. टी. खोबरेकर, सतीश कांबळी, संतोष राऊळ यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स