ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
येत्या १५ दिवसात प्रमुख रेल्वे गाडयांना कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा द्यायची महाविकास आघाडीच्या वतीने मागणी.

येत्या १५ दिवसात प्रमुख रेल्वे गाडयांना कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा द्यायची महाविकास आघाडीच्या वतीने मागणी.

प्रकाशन: 06 Sep 2024 07:40 AM
वाचन संख्या 66

अन्यथा कुडाळ वासीय नागरिक व महाविकास आघाडीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली २३ सप्टेंबर २०२४ रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा.

सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : कोंकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती व प्रवाश्यांच्या दृष्ठीने अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. परंतु कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या कुडाळ रेल्वे स्थानकावर थांबविल्या जात नाहीत. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनचे चेअरमन संतोष कुमार झा यांच्याशी पत्रव्यवहार करत बांद्रा टर्मिनस, गरीब रथ, दुरांतो एक्सप्रेस, मडगाव एलटीटी एक्सप्रेस, मँगलोर सीएसएमटी एक्सप्रेस या प्रमुख गाडयांना येत्या १५ दिवसात कुडाळ रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी पत्रात केली आहे.

ही मागणी मान्य न झाल्यास कुडाळ वासीय नागरिक व महाविकास आघाडीच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली दि २३ सप्टेंबर २०२४ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी दिला आहे. गणेशोत्सवा अगोदरच हे आंदोलन करण्यात येणार होते मात्र चाकरमानी व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी गणेशोत्सवानंतर २३ सप्टेंबर २०२४ रोजी आंदोलन करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स