ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मसुरेत पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरेत पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू..!

प्रकाशन: 06 Sep 2024 10:40 AM
वाचन संख्या 493

गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या हडकर कुटुंबावर काळाचा घाला..! 

मसुरे | प्रतिनिधी :  मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळे नजिक पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. पाण्यात पडलेली पत्नी पाहून पतीचा हृदयवीकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे.  गणेशोत्सवासाठी गुरुवारी सकाळी मुंबई वरून गावी आलेले बिपीन प्रभाकर हडकर ( ५१ वर्ष ) यांचा हृदयविकाराच्या धक्याने तर पत्नी उषा बिपीन हडकर ( ४८ वर्ष ) यांचा शौचालयाच्या टाकीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

मसुरे कावावाडी तर येथे मूळचे राहिवासी असलेले बिपीन हे नोकरीं निमित्त मुंबई येथे असतात. आपली पत्नी व यांच्या  सह गणेशोत्सवासाठी गुरुवारीच सकाळी मुंबई वरून आले होते. देऊळवाडा येथे त्यांनी जमीन विकत घेऊन चार वर्षांपूर्वी नवीन घर बांधले होते. गुरुवारी दुपारी जेवण वैगरे झाल्या नंतर ३ वाजण्याच्या सुमारास उषा या साफसफाई करण्यासाठी अंगणात गेल्या होत्या. बराचवेळ झाला तरी पत्नी कुठे दिसत नसल्याने बिपीन यांना वाटले कि पत्नी मसुरे येथे गेली असेल. त्यामुळे त्यांनी मसुरे येथील नातेवाईकांकडे फोनद्वारे सायंकाळी सवासहाच्या सुमारास  चौकशी सुद्धा केली. दरम्यान त्यांनी घरासभोवताली शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या सोबत बिपीन यांच्या बहिणीच्या दोन छोट्या मुली सुद्धा होत्या.

 घराच्या मागच्या बाजूला ते गेले असता शौचालयाच्या टाकी वरील कडपा  दगड तुटलेला दिसून आला. म्हणून त्यांनी टाकीमध्ये पहिले असता पत्नी टाकीतील पाण्यात पडलेली दिसली. टाकीमध्ये झाडू आणि चप्पल सुद्धा दिसून येत होते. यावेळी त्यांनी पत्नीला पाण्याबाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. बिपीन यांची काही दिवसा पूर्वीच एन्जोप्लास्टी  झाली होती व औषधपचार चालू होते.

दरम्यान समोरील दृश्य पाहून ते सुद्धा टाकी लगतच असलेल्या रानात कोसळले. हे पाहून छोट्या मुलीनी आरडा ओरडा केल्यावर बिपीन यांच्या ने याबाबत मुंबई येथे फोन केला व कुणाला तरी घरी पाठवण्यास सांगितले. येथील दाजीबा परब यांना फोनद्वारे माहिती मिळताच त्यांनी त्वरित घरी येत बिपीन यांना ग्रामस्थांच्या मदतीने घराच्या पुढील बाजूस आणले. काही प्रमाणात जिवंत असलेले बिपीन हे रुग्णवाहीका येई पर्यंत अंगणातच मृत झाले.

ग्रामस्थांनी प्रथमोपचार सुद्धा केले परंतु उपयोग झाला नाही. पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस  यांनी मालवण पोलीस स्थानकात माहिती दिली. दोन्ही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे शवविच्छेदन  करण्यासाठी नेण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिल्या. यावेळी मालवण पोलीस राजन पाटील, सुहास पांचाळ, कैलास ढोले, प्रमोद नाईक उपस्थित होते. देऊळवाडा आणि कावा ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला. बिपीन यांच्या पश्चात मुलगा, असा परिवार आहे. एन गणेशोत्सवात पती पत्नीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स