कणकवलीत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन.
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) महिला आघाडी यांच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशन येथे पोलिस बांधवांना राखी बांधून तसेच औक्षण करुन रक्षाबंधन संपन्न झाले. यावेळी सर्व पोलिस बांधवांच्या अथक सेवेबद्दल धन्यवाद देण्यात आले.
यावेळी कणकवली पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेना जिल्हा संघटक मधुरा पालव, तालुका संघटक माधवी दळवी, उपसंघटक संजना कोलते, संघटक दिव्या साळगावकर आदी महिला उपस्थीत होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)