ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आचरा हिर्लेवाडी समुद्रात नौका उलटून तिघांचा अंत ; एक जण बचावला.

आचरा हिर्लेवाडी समुद्रात नौका उलटून तिघांचा अंत ; एक जण बचावला.

प्रकाशन: 19 Aug 2024 02:02 PM
वाचन संख्या 450

मृतांमध्ये सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम उर्फ जीजी आडकर यांचा समावेश ; सर्जेकोट गांवासह मालवण तालुक्यात शोकाचे वातावरण.

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सर्जेकोट येथून ‘न्हय’ मासेमारीला गेलेली पात नौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात दाट धुक्यामुळे दुर्घटना ग्रस्त झाली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर एक खलाशाने पोहत किनारा गाठल्याने तो बचावला. मृतांमध्ये सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम उर्फ जीजी आडकर यांचा समावेश आहे. श्री. आडकर हे चौके हायस्कुल मधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. या दुर्घटनेमुळे ऐन नारळी पौर्णिमेला मच्छिमार बांधव तसेच सर्जेकोट गावावर शोककळा पसरली आहे.

सर्जेकोट येथील जीजी आडकर हे काल सायंकाळी आपली मच्छीमारी पातनौका घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते. आचरा पिरावाडी येथील समुद्रात दाट धुक्यामुळे अंदाज न आल्याने ही नौका पलटी झाली. यावेळी नौकेतील चारही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. एकाने किनारा गाठला तर तीन जण समुद्रात बुडाले. या सर्वांचे मृतदेह आचरा हिर्लेवाडी किनाऱ्यालगत सकाळी आढळले.

या दुर्घटनेमुळे सर्जेकोट गावासह मालवण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स