ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
तो सचिनला सहज मागे टाकू शकतो; पाँटिंगनं केली मोठी भविष्यवाणी

तो सचिनला सहज मागे टाकू शकतो; पाँटिंगनं केली मोठी भविष्यवाणी

प्रकाशन: 17 Aug 2024 10:59 AM
वाचन संख्या 113

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यामुळेच त्याला विक्रमादित्य या नावानेही ओळखले जाते. सध्याच्या घडीला विराट कोहली त्याच्या विक्रमाचा वेगाने पाठलाग करताना दिसतोय. अनेकदा सचिन-विराट यांच्यात तुलनाही केली जाते. सचिन तेंडुलकरचा एखादा विक्रम कोण मागे टाकेल? हा प्रश्न विचारला तर पहिलं नाव कदाचित विराटच येते. पण रिकी पाँटिंगला तसं वाटत नाही.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कसोटीतील सर्वाधिक धावांच्या रेकॉर्डसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. इंग्लंडचा स्टार बॅटर जो रूट याबाबतीत आघाडीवर जाईल, अशी भविष्यवाणी रिकी पाँटिंगनं केली आहे. इंग्लंडचा बॅटर जो रूट हा धावांसाठी भूकेला असणारा क्रिकेटर आहे. पुढील काही वर्षे त्याने सातत्य टिकवून ठेवले तर मास्टर ब्लास्टरचा कसोटीतील सर्वाधिक धावांचा विक्रम मागे पडेल, असे पाँटिंगनं म्हटले आहे.

वर्षाची आकडेवारी सांगत पाँटिंगनं केला भविष्यातील टेस्ट किंगसंदर्भातील दावाआयसीसी रिव्ह्यूमध्ये पाँटिंग म्हणाला आहे की, हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. तो आता ३३ वर्षांचा आहे. नवा विक्रम सेट करण्याची त्याच्याकडे संधी आहे. तो किती वर्षांपर्यंत खेळणार ते पाहावे लागेल. वर्षाला १० ते १४ कसोटीसह तो ८०० ते १००० धावा सहज काढतो. याच सातत्याने तो कामगिरी करत राहिला तर तीन चार वर्षांत तो कुठे पोहचेल विचार करा.”कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुट सध्या सातव्या क्रमांकावर आहे. या यादीत इंग्लंडचा एलिस्टर कूक १२४७२ धावांसह त्याच्या पुढे आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स