दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ, रॉयल ब्रदर्स यांच्या आयोजनात मालवणमध्ये 'भव्य दिव्य नारळ लढविणे 'स्पर्धा...
मालवण |
रॉयल ब्रदर्स आयोजित, दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण बंदर जेटी या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होणार आहेत.रॉयल ब्रदर्स आयोजित, दादा आचरेकर यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दि.१९ ऑगस्ट रोजी या स्पर्धा संपन्न होणार असून सकाळी ११ वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
विजेत्यांना प्रथम क्रमांक ३१,०००, द्वितीय क्रमांक १५,०००, तृतीय क्रमांक ५,०००, चतुर्थ क्रमांक २,५०० व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रवेश फी ७०० रुपये असून प्रथम १६ संघाना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनी स्वतः चे ५ नारळ आणायचे आहेत.उर्वरित नियम स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रॉयल यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आनंद आचरेकर ९३२५२०१३७५, हर्ष मिठबावकर ७०३८२३२५७२, सचिन साळगावकर ९३२५३०९९५२, दर्पण सादये ७७४४०९९०५५ यांच्याशी संपर्क साधावा.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)