ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चाफेड ग्रामपंचायत मध्ये उत्साही वातावरणात ध्वजारोहण संपन्न

चाफेड ग्रामपंचायत मध्ये उत्साही वातावरणात ध्वजारोहण संपन्न

प्रकाशन: 15 Aug 2024 08:48 PM
वाचन संख्या 219

चाफेड ग्रामपंचायत ते भरणी ग्रामपंचायत पर्यंत भव्यदिव्य मोटरसायकल रॅली

शिरगांव | संतोष साळसकर

देवगड तालुक्यातील चाफेड ग्रामपंचायती मध्ये आज १५ ऑगस्ट दिनी गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक सुनीता तुकाराम कांडर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावचे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच किरण मेस्त्री यांनी ध्वजारोहनाचा आपला मान गावातील ज्येष्ठ नागरिक सुनीता कांडर यांना देऊन समाजात एक चांगला आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी सरपंच किरण मेस्त्री, उपसरपंच महेश राणे, ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, सुदर्शन उर्फ नागेश साळकर, सौ. सानवी मेस्त्री, सौ. राधिका ठुकरुल, सौ. मानसी परब, सौ. प्रतिभा मेस्त्री, माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, साळशी हायस्कूल स्कूल कमिटी चेअरमन तथा माजी सरपंच सत्यवान भोगले, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय परब, प्रवीण राणे, चंद्रकांत साटम, महेश उर्फ बबन परब, प्रदीप घाडी, महेश घाडी, दिनकर घाडी, सत्यवान साटम, शिक्षक विकास वाडीकर, बाबासाहेब खेडेकर, श्री पांडे, प्रफुल्ल परब आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सरपंच किरण मेस्त्री, उपसरपंच महेश राणे यांच्या उपस्थित ग्रामपंचायत चाफेड ते ग्रामपंचायत भरणी पर्यंत गावातील युवकांनी भव्यदिव्य अशी मोटरसायकल रॅली काढून हर घर तिरंगा ची घोषणा देण्यात आली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स