ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
Paris Olympics 2024 : अभिनंदन भारत! हॉकी टीमनं पटकावले ब्रॉन्झ मेडल, स्पेनचा केला थरारक पराभव

Paris Olympics 2024 : अभिनंदन भारत! हॉकी टीमनं पटकावले ब्रॉन्झ मेडल, स्पेनचा केला थरारक पराभव

प्रकाशन: 08 Aug 2024 08:11 PM
वाचन संख्या 48

पॅरिस ऑलिम्पक मध्ये भारतानं ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे.

मुंबई |

पॅरिस ऑलिम्पकमध्ये भारतानं ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या लढतीमध्ये भारतानं स्पेनचा 2-1 नं पराभव केला.भारतीय टीम सुरुवातील पिछाडीवर होती. पण, भारतानं त्यानंतर जोरदार कमबॅक करत 2 गोल केले आणि विजेतेपद पटकावले.

सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुुरुष हॉकी टीमनं ब्रॉन्झ मेडल मिळवलंय. यापूर्वी टोक्यो ऑलिम्पिकमध्येही भाारतानं ब्रॉन्झची कमाई केली होती.

कसा झाला सामना?

भारत आणि स्पेन हाफ टाईमपर्यंत 1-1 नं बरोबरीत होते. मार्क मिरालेसनं गोल करत स्पेनला आघाडी मिळवून दिली होती. भारताकडून पहिला गोल हरमनप्रीत सिंहनं 30 व्या मिनिटाला केला. त्यानंतर हरमनप्रीतनंच 33 व्या मिनिटाला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.

भारताच्या अनेक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा गोलकिपर पीआर श्रीजेशचा हा शेवटचा सामना होता. श्रीजेशनं या सामन्यातही चपळ गोलरक्षण केलं. त्यानं स्पेनचे अनेक हल्ले परतावून लावले. अगदी शेवटच्या क्षणी स्पेनचा प्रयत्न रोखत भारताच्या ब्रॉन्झ मेडलवर शिक्कामोर्तब केलं

भारताचं चौथं मेडल

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं हे चौथं मेडल आहे. यापूर्वी भारतानं शूटिंगमध्ये तीन ब्रॉन्झ मेडल मिळवली होती. भारतीय हॉकी टीमनं या स्पर्धत ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला पराभूत केलं. सेमी फायनलमध्ये जर्मनीविरुद्ध पराभूत झाल्यानं भारताचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न हुकलं. भारतीय हॉकी टीमनं आजवर ऑलिम्पिकमध्ये 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत. भारतानं 1980 साली मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये शेवटचं गोल्ड मेडल जिंकलं होतं.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स