ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
"कणकवलीचे कनक रायडर्स ठरले खरे कोजागिरी डिसायडर्स...!"

"कणकवलीचे कनक रायडर्स ठरले खरे कोजागिरी डिसायडर्स...!"

प्रकाशन: 20 Oct 2021 04:10 PM
वाचन संख्या 74

विशेष वृत्त

कणकवली | उमेश परब :कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री शरदाच्या चांदण्यात ,चंद्र त्याच्या किरणांतून अमृत बरसवत असतो….आणि तेच किरण गोड दुधात पडले की ते दूध चित्त,आरोग्य आणि अध्यात्म यांची शांती बहाल करते…दुधाची स्निग्धता शरीराला पुष्टी देते आणि अमृताचे माधुर्य सर्व वाईट विचार,कृती यांपासून मानवाला परावृत्त करते”, असे पूर्वीपासूनचे सांगणे आहे. बाकी त्याला वैज्ञानिक आधार किती आहे हे आजची पिढी जाणतेच परंतु त्यातल्या संदेशालाही आजची पिढी किती सजगतेने समजू लागुन स्वतःच्या निरामय आरोग्य व जीवनाचे खरेखुरे ‘कोजागिरी डिसायडर्स’ ठरतायत ते कणकवलीचे तडफदार ‘कनक रायडर्स…!’ आजचा तरुण उद्याचे देशाचे भविष्य हे जाणून या कनक रायडर्सनी कोजागिरी साजरी करायची एक अनोखी पद्धत जगातील सर्वांनाच दाखवली आहे . तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन वाममार्गाला लागत आहे असा खूपदा अनुभव येतो. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तर हा प्रकार आपल्या सर्वांनाच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. लहान मुले सदैव मोठ्या माणसांचे अनुकरण करत असतात यासाठी आदर्श म्हणून सायकलिंग ची आवड मुलांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी व समाजातील एक जबाबदार घटक म्हणून कनक रायडर्स सायकल क्लबच्या सदस्यांनी ” तंदुरुस्तीची सवारी” तथा राइड फार फिटनेसचा संदेश देत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एकत्र येऊन शंभर किलोमीटर ची सायकल राईड पूर्ण केली. या राईड मध्ये कनक रायडर्स चे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे, कैलास सावंत, संजय बिडये, योगेश महाडिक, संतोष कांबळे, उमेश मोरे, प्रतीक सावंत, संदेश मयेकर, नितांत चव्हाण, बाळू मेस्त्री, सिद्धेश सावंत हे रायडर्स सहभागी झाले होते. अशीही काव्य ,गीत ,संगीत यासोबतच आता अशी कोजागिरी साजरी करता यायचे हे ” कोजागिरीचे डिसायडर्स” म्हणून आता जिल्ह्यात “कनक रायडर्स” नक्कीच नविन पायंडा पाडून जातायत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स