कै. गुरुवर्य प्रमोद सुतार यांच्या शिष्य-परीवारातर्फे २४ रोजी शोकसभा
कणकवली | उमेश परब : प्रसिद्ध भजन सम्राट मृदुंगमणी तसेच किर्तनकार गुरुवर्य प्रमोदजी सुतार यांचे दि. २ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांचा शिष्य परिवार पोरका झाला आहे. संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली.त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील समस्त शिष्य-परीवाराच्या वतीने रविवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक १०.०० वा. ‘भावगंगा सदन’ श्री. पांडुरंग हडकर (कृषी), गावडेवाडी रोड, ओरोस येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोकसभेस सर्व शिष्यगण, हितचिंतक, नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिष्य परीवारांच्यावतीने करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)