ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मडुऱ्यात महिलांची तेजस्वी 'पणत्यांची महाआरती' ठरली लक्षवेधी...!

मडुऱ्यात महिलांची तेजस्वी 'पणत्यांची महाआरती' ठरली लक्षवेधी...!

प्रकाशन: 20 Oct 2021 12:12 AM
वाचन संख्या 46

बांदा : राकेश परब : मडुरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रमा बरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यावर्षी आकर्षक पैठणीच्या मानकरी सौ. लक्ष्मी विष्णू परब ठरल्या. गावातील सुवासिनींच्या उपस्थितीत झालेली पणत्यांची महाआरती लक्षवेधी ठरली. उत्सव काळात हजारो भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घेतला.
मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात गेले आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बाळकृष्ण गोरे दशावतार, चेंदवणकर दशावतार, इन्सुली माऊली दशावतार, पार्सेकर दशावतार व नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळांचे नाट्यप्रयोग संपन्न झाले. अणसूर येथील संगीत विशारद दिप्तेश मेस्त्री यांचा सुमधूर भजनाचा कार्यक्रम पार पडला.
गावातील सुवासिनींच्या उपस्थितीत झालेली महाआरती सर्वाधिक लक्षवेधी ठरली. यावेळी पैठणीच्या मानकरी ठरलेल्या सौ. लक्ष्मी परब यांना माजी ग्रा. पं. सदस्या सौ. विनिता पावसकर यांच्या हस्ते आकर्षक पैठणी प्रदान करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजना बद्दल समिती अध्यक्ष अनंत परब यांचा देवस्थान समितीकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी समिती सचिव संतोष परब, दत्ताराम परब, सोमनाथ परब, विजय परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील नितीन नाईक यांनी केले. उत्सव काळात हजारो भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स