रांगणा गड दुर्गदर्शन आणि वृक्षारोपण मोहीम संपन्न ; ३९ दुर्गप्रेमींचा सहभाग.
शिरगांव | प्रतिनिधी : दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे, कुडाळ तालुक्यातील रांगाणा गड दुर्गदर्शन व वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. ३० जून रोजी संपन्न झालेल्या या मोहीमेत यावेळी ३९ दुर्गप्रेमीनी सहभाग घेतला. या मोहिमेत गडावरील ऐतिहासिक वास्तू तसेच गडाचा इतिहास सहभागींनी जाणून घेतला. यावेळी रांगणा गडावर जांभूळ झाडांबरोबर इतर झाडे लावण्यात आली.
या मोहिमेला गणेश नाईक, समिल नाईक, समता वारंग, शिवाजी परब, रोहन राऊळ, हेमांगी जोशी, योगेश येरम, प्रसाद पेंडूरकर, हेमालता जाधव, अमोल भोगले, गार्गी नाईक, लक्ष्मण फोफळे, जालिंदर कदम, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, संकेत सावंत, स्वप्निल सावंत, सोनी राऊळ, शशिकांत डांगरे, प्रसाद पालकर, राहुल मांडवकर, सुषमा पालव, स्वप्निल पालकर, महेश सावंत, डांगरे मॅडम, जगदीश धुरी, आदित्य जोशी, सानिया कुडतरकर, अमेय सावंत, श्वेता सावंत, सारिका वारंग, रामचंद्र वारंग, प्रणिता भोयर, मानसी परब, ऋतुराज सावंत, तेजस पोयेकर, संध्या सावंत, मनिष राणे, स्वप्निल राणे, मनिष कलिंगण, गणेश आनंदे आदी दुर्गप्रेमीनी सहभाग घेतला. या मोहिमेसाठी नाश्ताची सोय सारिका वारंग यांनी तर या मोहिमेसाठी सुषमा पालव यांनी झाडे उपलब्ध करून दिली. दात्यांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)