ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
एक पेड़ माॅ के नाम ; ज्ञानदीप विद्यालय, वायंगणी येथे वृक्ष संवर्धन उपक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम.

एक पेड़ माॅ के नाम ; ज्ञानदीप विद्यालय, वायंगणी येथे वृक्ष संवर्धन उपक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम.

प्रकाशन: 28 Jun 2024 07:30 PM
वाचन संख्या 197

मुख्याध्यापक श्री. डि. जे. टकले आणि वनक्षेत्रपाल श्री. शिंदे यांनी केले मार्गदर्शन.

आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप विद्यालय, वायंगणी येथे केंद्र सरकार च्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी, ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रम सुरु करण्यात आला. या निमित्त
ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. डि. जे. टकले म्हणाले की, अमर्याद वृक्ष तोडीने पर्यावरणाचा -हास होत आहे. यामुळे वाढत्या तपमानाचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

यावेळी वनपाल श्री. प्रकाश शिंदे, रामेश्वर वाचनालय, आचरा यांचे कार्यवाह श्री. अर्जुन बापर्डेकर व शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी ‘एक पेड मा के नाम’ या उपक्रमाबाबत माहिती दिली आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना स्पष्ट केले. यावेळी शाळेला वनक्षेत्रपाल श्री. शिंदे यांनी, विविध प्रकारची झाडे भेट दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स