ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साने गुरुजी कथामाला ; आचरा येथे संपन्न झालेल्या बैठकीत कथाकथन स्पर्धेच्या तारीख आणि विषयांची झाली घोषणा.

साने गुरुजी कथामाला ; आचरा येथे संपन्न झालेल्या बैठकीत कथाकथन स्पर्धेच्या तारीख आणि विषयांची झाली घोषणा.

प्रकाशन: 28 Jun 2024 06:45 PM
वाचन संख्या 204

आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात प्रतीवर्षी ‘साने गुरुजी कथामाला मालवण व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे’ , यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी शाळास्तर, केंद्रस्तर आणि तालुकास्तर अशी भव्य कथाकथन स्पर्धा आयोजित केले जाते. या वर्षीसाठी स्पर्धेतील अंतिम कथाकथन स्पर्धा २० नोव्हेंबर २०२४ रोजी, परम पूज्य प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी आचरे, ता. मालवण येथे संपन्न होणार आहे. मालवण तालुका कथामालेची सभा सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यासभेत या माहितीच्या घोषणा करण्यात आल्या. या सभेला मार्गदर्शक म्हणून श्री. सुरेश ठाकुर यांच्यासह रामचंद्र कुबल, परशुराम गुरव, सायली परब, संजय परब, कामिनी ढेकणे. अमृता मांजरेकर, भवन मांजरेकर, मनाली फाटक आदी उपस्थित होते.

( गट अ – इयत्ता ३री, ४थी – कथा प्रकार : जीवन कथा. )
कथा विश्लेषण – साने गुरुजींचे जीवन प्रसंग निवेदक स्वतः सांगत आहे. किमान ते कमाल वेळ – ३ ते ४ मिनिटे

गट ब – इयत्ता ५वी, ६वी :कथा प्रकार – चरित्र प्रसंग कथा.
कथा विश्लेषण – दहा पैकी एका समाजसुधारकांच्या जीवनकार्यातील प्रसंग कथा. किमान ते कमाल वेळ – ४ ते ५ मिनिटे.

गट क – इयत्ता ७वी, ८वी – कथा प्रकार – संस्कार कथा.
कथा विश्लेषण – अंधश्रद्धा निर्मूलन – ज्या कथेचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असेल अशी कथा.
किमान ते कमाल वेळ – ५ ते ६ मिनिटे.

गट अ : जीवन कथा – साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील ४२ रात्रींपैकी कोणतीही एक रात्र निवेदकाने स्वतः कथनीय करून सादर करायची आहे. जशीच्या तशी नको आणा ती त्या वेळेत बसविणे ह्या अटी आहेत.

गट ब – चरित्र प्रसंग कथा -१) प. पू आप्पासाहेब पटवर्धन, २) नरेंद्र दाभोलकर, ३) डॉ अभय बंग, ४) डॉ .राणी बंग, ५) डॉ. प्रकाश आमटे, ६) डॉ. मंदाकिनी आमटे, ७) सिंधुताई सकपाळ, ८) समाजसेवक विनायक दामोदर सावरकर, ९) अण्णाभाऊ साठे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या दहा समाज सुधारकांपैकी एका समाजसुधारकांच्या जीवन कार्यातील प्रसंग कथा.

गट क : संस्कार कथा – अंधश्रद्धा निर्मूलन – ज्या कथेचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन करणारे असेल अशी कथा; त्यातून लोकांचे प्रबोधन होईल.

अधिक माहिती साठी रामचंद्र एकनाथ कुबल ( ९४२०२१०८११) व सुगंधा केदार गुरव (९४२००७८५१९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण तालुका कथामालेतर्फे करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स