ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा येथे आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्लास्टिक स्टूल वाटप.

बांदा येथे आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्लास्टिक स्टूल वाटप.

प्रकाशन: 24 Jun 2024 03:08 PM
वाचन संख्या 127

बांदा | राकेश परब : भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांच्या माध्यमातून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्लास्टीक स्टूल वितरण करण्यात आले. बांदा आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांसाठी स्टूल देण्याची मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांच्याकडे सदर सर्व स्टूल देण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, सरपंच प्रियांका नाईक, वाफोली उप सरपंच विनेश गवस, बांदा ग्रा. पं. सदस्य प्रशांत बांदेकर, आबा धारगळकर, श्याम मांजरेकर, देवल येडवे, ज्ञानेश्वर सावंत, सुधीर शिरसाट, कैलास गवस, नीलेश कदम, गुरू कल्याणकर, स्वप्निल सावंत, गुरुनाथ सावंत, विलास पावसकर, दीपक सावंत, सिद्धेश महाजन, अक्षय परब, शुभम साळगावकर, बाळा आकेरकर, वसीम बुराण, शैलेश केसरकर, ऋषी सावंत, सुनील धामापूरकर, प्रवीण नाटेकर, शीवनाथ मळेवाडकर उपस्थित होते. डॉ. सारंग यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स