प्रशासनाने विलंब केला तर स्वखर्चाने दुरुस्तीची व्यवस्था ; भाजपा नेते निलेश राणे यांनी कांदळगांव येथील क्षतिग्रस्त शाळेची पहाणी करत दिल्या सूचना.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव नं. २ या शाळेचे, १५ जून दिवशी छप्पर कोसळले होते. भाजपा नेते निलेश राणे यांनी आज, सोमवारी कांदळगाव येथे भेट देऊन शाळेची पहाणी करत संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीच्या सूचना व आदेश दिले आहेत. जर प्रशासनाने कार्यवाही करण्यास विलंब केला तर आपल्या स्वखर्चातून शाळा दुरुस्तीच काम करण्याची व्यवस्था केली असून आज पासून या शाळेच्या दुरुस्तीच काम सुरू होईल. लवकरात लवकर ही शाळा विध्यार्थ्यांसाठी सुरू होईल. असेही त्यांनी स्पष्ट केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)