ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ तालुक्यातल्या दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.

कुडाळ तालुक्यातल्या दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.

प्रकाशन: 17 Jun 2024 12:47 PM
वाचन संख्या 131

आमदार वैभव नाईक व कुडाळ युवासेनेचे आयोजन.

कुडाळ | देवेंद्र गावडे : कुडाळ तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी, बारावी (शाखा निहाय प्रथम ३) परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक व युवासेना कुडाळच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. रविवार २३ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, संदेश पारकर, अभय शिरसाट, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, श्रेया परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. तरी कुडाळ तालुक्यातील सर्व शासकीय व खाजगी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ तालुका युवासेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

      

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स