ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत  दहा विद्यार्थी दत्तक.

दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत दहा विद्यार्थी दत्तक.

प्रकाशन: 16 Jun 2024 10:02 PM
वाचन संख्या 206

शिरगांव | प्रतिनिधी : दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण दहा गरजू विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले. दर वर्षी शैक्षणिक वर्षामध्ये दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. यावर्षी एक मदत गरजू विद्यार्थ्यासाठी या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा साळशी नं १ येथील चार विद्यार्थी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाफेड नं १ येथील दोन विद्यार्थी, वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं १ येथील एक विद्यार्थी, मालवण तालुक्यातील पेंडूर हायस्कूल येथील एक विद्यार्थी, कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर येथील दोन विद्यार्थी या शैक्षणिक वर्षासाठी देणगीदारांच्या सहकार्याने दत्तक घेण्यात आले. यामध्ये वर्षभर लागणारे शैक्षणिक व इतर आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताना फोटो घेतले गेलेले नाहीत. हे साहित्य काही ठिकाणी विद्यर्थ्याना प्रत्यक्ष घरी, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्याकडे सदर साहित्य सुपूर्द करण्यात आले.

सदर उपक्रमासाठी रश्मी सावंत, डॉ अनघा गावडे, दिपाली परब, वैभव परब, सचिन प्रभाकर बागवे, मंदार वारंग, हृदयनाथ गावडे, सच्चिदानंद राऊळ, सुनिल करडे, बाबाजी परब, सुनिल धोंड, अमोल भोगले, समता भोगले, समील नाईक, हेमलता जाधव, सुहास गुरव, योगेश येरम, उत्कर्षा वेंगुर्लेकर, संदेश गोसावी, गणेश नाईक इत्यादी दात्यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांचे सर्वांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स