वाफोली ग्रामपंचायततर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
बांदा | राकेश परब : वाफोली ग्रामपंचायतच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत यश संपादन केलेल्या गावातील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. अभ्यास व कठोर मेहनत घेऊन भविष्यात यशस्वी व्हा आणि गावाचे नाव उज्वल करा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले.
यावेळी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, वाफोली सोसायटी चेअरमन सौ. धनश्री गवस, आना गवस, अनिल गवस, मारुती गवस, रंजन गवस, सत्यवान परब, मंजुळा शेगडे, साक्षी शिरोडकर, शुभदा आईर, वैभवी दैसाई, प्रा.परब, प्रा.म्हैत्री, बापू राणे, सुरेश गवस, सचिन गवस, श्रीकृष्ण गवस, राजू गवस, अमित कळंगुटकर, सचिन ठाकर, संदीप धुरी, लवू कांबळे उपस्थित होते.
यावेळी एकूण ३२ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सुपारीचे रोप देऊन गुणगौरव करण्यात झाला. आभार ग्रामसेवक प्रसाद ठाकूर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)