ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नारिंग्रे येथे विद्यार्थ्यांना छत्री वाटप.

नारिंग्रे येथे विद्यार्थ्यांना छत्री वाटप.

प्रकाशन: 16 Jun 2024 05:44 PM
वाचन संख्या 174

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या नारिंग्रे येथील भूतवाडी ग्रामस्थ विकास मंडळ यांच्या वतीने नारिंग्रे गावातील अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. नारिंग्रे गावातील आबासाहेब राणे विद्या मंदिर येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळा, तसेच भूतवाडी येथील अंगणवाडी व दत्त विद्या मंदिर आणि सडावाडी येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळा अशा सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. मुंबईच्या मंडळाचे विश्वस्त रघुवीर वायंगणकर, अध्यक्ष प्रकाश द. घाडीगावकर, जयवंत मेस्त्री, पोलीस पाटील संदीप राणे सुनील मेस्त्री, प्रदीप घाडी, विनय घाडी, मुकेश घाडी, भरत पाटील, मंगेश घाडी, बाळा पाटील, विलास वायंगणकर आदी उपस्थित होते. यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमांमध्ये प्रास्तविक रघुवीर वायंगणकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश दत्ताराम घाडीगावकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन जयवंत मेस्त्री यांनी केले. मुंबईच्या मंडळाचे नंदकुमार दत्ताराम घाडीगावकर यांच्यासह अनेकांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स