ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवण (वायरी भूतनाथ, मोरेश्वर वाडी) येथील श्री. विक्रम तोडणकर यांच्या जळालेल्या घराची आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण (वायरी भूतनाथ, मोरेश्वर वाडी) येथील श्री. विक्रम तोडणकर यांच्या जळालेल्या घराची आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी.

प्रकाशन: 16 Jun 2024 04:53 PM
वाचन संख्या 272

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वायरी – भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील श्री. विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरास नुकतीच भीषण आग लागली. यात घरासह, आतील साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. त्यामुळे विक्रम तोडणकर कुटुंबियांची प्रचंड हानी झाली. त्यानंतर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल दुपारी तातडीने याठिकाणी भेट देत घराची पाहणी केली. तसेच काही प्रमाणात आर्थिक मदत करीत तोडणकर कुटुंबियांना धीर दिला.

यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच नाना नाईक, शाखा प्रमुख जयवंत लुडबे, चिंतामणी मयेकर, दाजी जोशी, चंदू प्रभू, नितीन तोडणकर, श्री खोबरेकर, भूपेंद्र तोडणकर, रवी मेस्त आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स