ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आंबोली घाट व धबधबा परिसरात सामूहीक स्वच्छता मोहीम संपन्न.

आंबोली घाट व धबधबा परिसरात सामूहीक स्वच्छता मोहीम संपन्न.

प्रकाशन: 14 Jun 2024 09:12 PM
वाचन संख्या 258

आंबोली घाटातील निसर्ग व जैविविधता टिकविण्यासाठी सर्व नागरिक व पर्यटक यांनी वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन ; अस्वच्छता केल्यास १००० रुपयांचे उपद्रव शुल्क..!

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वन विभागाच्या अधिकारी – कर्मचारी यांनी मिळून सामूहिक स्वछता मोहीम संपन्न केली. या स्वछता मोहिमे अंतर्गत घाट सुरु होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे १० किमी अंतराच्या दुतर्फा रस्ता परिसराची स्वच्छता करण्यात आली.

यावेळी उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या संकल्पनेतून जैव विविधतेने नटलेल्या आणि कोकणाचे वैभव असलेल्या आंबोली घाट व धबधबा यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने निसर्गावर घाला घालणाऱ्या अशा कचऱ्याचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली होती. या अंतर्गत वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून धबधबा व घाट परिसरात पसरलेल्या कचऱ्याला वेचून एकत्र करण्यात आले. सर्व एकत्रित केलेला, अंदाजे १ टन कचरा हा सावंतवाडी नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रात सुपूर्द करण्यात आला. या स्वछता मोहिमेची उपस्थित सर्वांनी आणि मार्गावरील वाहन चालक, वाटसरू तसेच पर्यटक यांनी प्रशंसा केली. सदरची स्वछता मोहीम ही सावंतवाडी वनक्षेत्रपाल – मदन क्षीरसागर, देवसू वनपाल – नागेश खोराटे, आंबोली वनपाल – नामदेव चौगुले यांचे नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यामध्ये सावंतवाडी परीक्षेत्र व आंबोली परीक्षेत्र मधील सर्व अधिकारी – कर्मचारी सहभागी झालेले होते. यासोबतच धबधब्यावर स्टॉल लावणारे स्टॉलधारक, काही आंबोली ग्रामस्थ, संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोलीचे सर्व सदस्य यांनी या स्वच्छतेकामी महत्वाचा सहभाग नोंदविला.

सर्व पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांना सावंतवाडी वन विभागकडून आवाहन करण्यात येते की आंबोली घाट तसेच धबधबा परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी असून त्याचे पर्यटकांनी व सुजाण नागरिकांनी नेहमीच जाण ठेवावी. १५ जून २०२४ पासून आंबोली घाट तसेच धबधबा परिसरात अस्वच्छता करणे, माकड ( वानर) यांना खाऊ घालणे यासाठी १००० रुपयांचे उपद्रव शुल्क आकारण्यात येणार आहे. राखीव संवर्धन क्षेत्र असलेल्या अशा आंबोली घाटातील जैवविविधता टिकवणे, अनिर्बंधीत पर्यटनावर चाप लावणे तसेच माकडांना खाऊ घालण्यामुळे त्यांच्या मानवावरील हल्ले व सवयी मध्ये होणारे बदल रोखणे यासाठी हे कडक निर्बंध वन विभागाने लागू केले असल्याचे जिल्ह्याचे वन विभाग प्रमुख, उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी यांनी सांगितले आहे. तरी आंबोली घाटातील निसर्ग व जैविविधता टिकविण्यासाठी सर्व नागरिक व पर्यटक यांना वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स