मालवणात १०३४ रोपांचे वाटप ; युवासेना प्रमुख व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना व युवासेनेचा सामाजिक कार्यक्रम.
मालवण | ब्यूरो न्यूज : युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरणमंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना व मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण तालुक्यातील नागरिकांना गुरुवारी काजू व रतांबा झाडांच्या १०३४ रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शिवसेना शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, पूनम चव्हाण, राजू परब, उमेश मांजरेकर, अनंत पाटकर, किरण वाळके, नरेश हुले, चिंतामणी मयेकर, नाना नाईक, भार्गव खराडे, अक्षय रेवंडकर आदी युवासैनिक, व नागरिक उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)