कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या वतीने गुणवंतांचा आणि दशावतारी कलावंतांचा होणार सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्या वतीने १६ जूनला, कट्टा येथील ओम गणेश साई मंगल हॉल येथे दहावी, बारावीत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच भंडारी समाजातील दशावतारी कलाकारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी अडिच विद्यार्थ्यांचा तसेच दशावतारी कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. रात्री साडेसात वाजता अगस्त्यायन हे पौराणिक दशावतार महानाट्य सादर होणार आहे तरी या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)