ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न दिलेल्या मुदतीत न सोडवल्यास आंदोलनाला इशारा.

सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न दिलेल्या मुदतीत न सोडवल्यास आंदोलनाला इशारा.

प्रकाशन: 12 Jun 2024 07:44 PM
वाचन संख्या 108

मसुरे | प्रतिनिधी : सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्याची एकत्र बैठक सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात प्रकाश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेत सेवानिवृत्त ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याचे समोर आले. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या जिल्हा कार्यकारिणीने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. दिलेल्या मुदतीत प्रशासनाकडून प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी दिली. जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत प्रभू, सचिव प्रकाश राणे, मधुकर घाडी, संतोष जाधव, एस. बी. पेडणेकर, रामा ठाकुर, एन. यू, राऊळ, व्ही. आर. राऊळ, ए. आर. वारंग, विष्णू चराटकर, सत्यविजय सावंत, आर. आर. सावंत, नारायण धुरी, मनोहर वेंगुर्लेकर, विष्णू थुरी, प्रमोद तोरसकर, गोकुळदास शिरसाट, -संदीप बांदेकर, रामचंद्र कोचरेकर, एस. एस. मोरे आदी सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

महासंघ सिंधुदुर्गला धर्मादाय आयुक्तांची अधिकृत नोंदणी मिळाल्याने संघटना अधिकृत झाली. त्यामुळे सभासदांनी आनंद व्यक्त केला. सेवानिवृत्त सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची नोंदणी करून घेण्यात यावी, असे ठरले. दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवकांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे समोर आले. पेन्शन उशिरा जमा होणे, आश्वासित योजनेची प्रकरणे प्रलंबित ठेवणे, रजा रोखीकरण, आदर्श ग्रामसेवक वेतन वाढ, १५ वर्षानंतर पूर्ण पेन्शन न मिळणे, ८० वर्षानंतर २० टक्के पेन्शन वाढ, सेवापुस्तके गहाळ होणे, पेन्शनरांच्या पश्चात त्यांच्या अविवाहित वा अपंग मुलींना पेन्शन न मिळणे, बक्षीस समितीनुसार विस्तार अधिकारी पदाची वेतनश्रेणी ग्रामविकास अधिकारी यांना लागू न करणे आदी प्रकरणे प्रलंबित आहेत. ग्रामविकास अधिकारी बांदेकर यांची पेन्शन केस प्रलंबित असून नियमित पेन्शन मिळत नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा कार्यकारिणीने संबंधित अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असे ठरविण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स