मुंबई - गोवा महामार्गावर डंपर पलटून अपघात ; चालक जागीच ठार.
ब्यूरो न्यूज | राजापूर : मुंबई – गोवा महामार्गावर वाटुळ नजिकच्या एका वळणावर, एका डंपरचा अपघात होऊन डंपर चालक जागीच ठार झाला आहे. आज बुधवारी दुपारी १२:३० च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातात डंपर पलटी झाल्यानंतर डंपरच्या केबिनने पेट घेतला व त्यानंतर संपूर्ण डंपरलाही आग लागली. राजापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाने ती आग विझवली.
वाटुळ येथील एका तीव्र उतारावर डंपर चालकाचे डंपरवरील नियंत्रण तुटल्याने, हा वाळुने भरलेला डंपर २५ फूट खोल दरीत कोसळला हा अपघात एवढा भीषण होता की यात डंपर चालकाच्या देहाचे दोन तुकडे झाले. या अपघाताचे वृत्त समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)