ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळ कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कुडाळ कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

प्रकाशन: 16 May 2024 09:16 AM
वाचन संख्या 178

व्यावसायिक प्रमोद नलावडे आणि सवंगडी यांनी व्यक्त केले मनोगत.

शिरगांव | संतोष साळसकर : कुडाळ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेच्या १९७९ – ८० बॅचचा स्नेहमेळावा कुडाळ तालुक्यातील कोकण हेरिटेज रिसॉर्ट मुळदे येथे संपन्न झाला. गुरूजनांनी घालून दिलेली शिस्त आजही आपल्या गृपमध्ये दिसून येते ती तशीच पुढे राहो. वाचण्याचा छंद असाच कायमस्वरूपी जोपासा असे आवाहन यावेळी प्रसिद्ध व्यावसायिक प्रमोद नलावडे यांनी केले.

‘नाते विश्वासाचे’ ही टॅगलाईन घेऊन चालणारा आणि मैत्रीचा खरा अर्थ सांगणारा हा सोहळा २०१६ पासून सूरू झाला असून तो प्रत्येक वर्षी त्याच एकजुटीने संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्गातील माजी विद्यार्थी महेश भांडारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवगड येथील प्रसिद्ध व्यावसायिक प्रमोद नलावडे होते. या दरम्यान , ३१ मे २०२४ सेवानिवृत्त होणारे विनायक परब (गोवा) यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. परब यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भावना गोवन कोंकणी भाषेत व्यक्त केल्या.

दुपारच्या सत्रात महेश भांडारकर, मधुकर कुबल यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम झाला. शोभा राऊळ यांनी सुंदर दोन कथा सांगितल्या. प्रकाश कोचरेकर यांनी योगाचे महत्व तर अनिल गावडे यांनी सामाजिक बांधिलकी कशी असावी याची माहिती दिली. राजन कांबळी, नंदकिशोर बोर्डवेकर यांनी ग्रुपचे महत्व सांगितले. दिलीप प्रभू खानोलकर यांनी गृपमधील सर्वांच्या मनातील भावनांचे विवेचन केले. या कार्यक्रमास दिगंबर सडवेलकर, किशोर शिरसेकर, विनायक परब, रवी नेवाळकर, महेश भंडारकर, मधू कूबल, दीलीप प्रभूखानोलकर, संतोष आंबडोसकर, शरद आकेरकर, अनील गावडे, लक्ष्मण मेस्त्री, प्रकाश कोचरेकर, दिनकर वालावलकर, अशोक मेस्त्री, राजन कांबळी, नंदकिशोर बोर्डवेकर, सुमंगल परब नलावडे, पुष्पलता बोभाटे भिसे, सुधा रेगे केणी, गीता दाभोलकर, शोभा राऊळ, सुनीता वालावलकर प्रभू तेंडुलकर, हेमलता दांडेकर मराठे उपस्थित होते. संकल्पना विनायक परब, किशोर शिरसेकर, सुधा रेगे, संयोजन दिनकर वालावलकर, संतोष आंबडोसकर, गीता दाभोलकर, तर आभार मधू कूबल, शरद आकेरकर यांनी मानले.

फॅमिली स्नेह मेळावा ही नवीन संकल्पना अशोक मेस्त्री यांनी व्यक्त केली. तसा ठराव किशोर शीरसेकर यांनी मांडला. पूढील गेट टुगेदर कुडाळ येथे १८ मे २०२५ रोजी होईल याची घोषणा शरद आकेरकर यांनी केली. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन सर्वजण आठवणीची शिदोरी घेऊन घरी परतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स