ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'नाईट लाईफ' वर रहाणार पोलिसांची  करडी नजर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'नाईट लाईफ' वर रहाणार पोलिसांची करडी नजर..!

प्रकाशन: 15 May 2024 08:24 PM
वाचन संख्या 401

गोपनीय माहिती व प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांची धडक कारवाई मोहीम सुरू राहणार : मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर परिसरातन गेल्या काही दिवसात पोलिसांकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी अनुषंगाने तसेच मागील काही दिवसात रात्रीच्या वेळी घडलेल्या काही वादाच्या घटना पाहता पोलिस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या ‘नाईट लाईफ’ च्या काळात तशी कारवाई मोहीम विशेष पथकाच्या माध्यमातून सूरू राहणार आहे अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

रात्री उशिरा रस्त्यावर काही ठिकाणी गर्दी व गोंगट असणे, भरधाव वेगात तसेच कर्णकर्कशपणे मोटरसायकल व अन्य वाहने चालवणे, दारू पिऊन नशेत वाहने चालवणे याबाबत काही तक्रारी संबंधित वाहनांच्या क्रमांकांसह आल्या आहेत असे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी स्पष्ट केले असून या कारवाई मोहिमेदरम्यान अशी संबंधीत वाहने दिसून आल्यास त्यावर नियमानुसार धडक पोलिसी कारवाई केली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.

मध्यरात्री पर्यत सूरू असणार्या अशा पान टपरी, चायनीज दुकाने, हॉटेल की ज्या ठिकाणी वादाच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत किंवा घडत असतील अशा ठिकाणांवर सर्वांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे अशा सूचना देखील पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिल्या आहेत.

चायनीज दुकाने, हॉटेल याठिकाणी कोणत्याही ग्राहकाला मद्य सेवनास बसू देऊ नये असे सांगत त्यांनी बहुतांश ठिकाणी नियमांचे पालन योग्य पद्धतीने होते हे स्पष्ट केले. मात्र कुठल्याही ठिकाणी कोणी ग्राहक हॉटेल मध्ये येऊन दादागिरी दमदाटी पद्धतीने दारू पिण्यास बसत असेल तर हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

अवैध दारू विक्री, अमली पदार्थ विक्री काही ठिकाणी होते. याबाबतही काही गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या ठिकाणी अधिक माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे. तरी कोणत्याही ठिकाणी जसे की सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, पर्यटन ठिकाणे व अन्य अंतर्गत मार्ग अश्या सर्व ठिकाणी अवैध दारू अथवा अन्य अमली पदार्थ घेण्याच्या उद्देशाने कोणी संशयीत व्यक्ती दिसून येत असतील तर तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलीस पथक त्या ठिकाणी तात्काळ पोहचून कारवाई करेल असे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स