ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चाफेड गावठण येथील कुलस्वामिनी मंदिरात उद्या वार्षिक उत्सव..!

चाफेड गावठण येथील कुलस्वामिनी मंदिरात उद्या वार्षिक उत्सव..!

प्रकाशन: 09 May 2024 08:36 PM
वाचन संख्या 189

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या
देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील आई कुलस्वामिनी मंदिरात उद्या शुक्रवारी १० मे रोजी वार्षिक उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

यादिवशी सकाळी १० ते १ मूर्ती पूजन व गंगा पूजन, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, ४ वाजता स्थानिक भजने, सायंकाळी ६.३० वाजता बुवा विशाल मसुरकर आणि बुवा समीर कदम यांच्यात आमने – सामने संगीत डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. तसेच रात्रौ ११.३० वाजता श्री देव घोडेस्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळींचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.

या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आई कुलस्वामिनी मित्र मंडळ चाफेड गावठण, आई कुलस्वामिनी युवा प्रतिष्ठान , ग्रामस्थ, मुंबई मंडळ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स