ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
व्हेल माशाच्या उलटी संदर्भात शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठी सार्वजनिक अभ्यास गटाची स्थापना.

व्हेल माशाच्या उलटी संदर्भात शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठी सार्वजनिक अभ्यास गटाची स्थापना.

प्रकाशन: 10 May 2024 02:15 PM
वाचन संख्या 190

समन्वयक रविकिरण तोरसकर यांनी दिली प्रसिद्धी पत्राद्वारे माहिती ; मत्स्य, फॉरेस्ट, शिक्षण व संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश.

मालवण : गेल्या काही वर्षांमध्ये व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस सापडण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच त्याच्या कथित तस्करी बद्दल मच्छिमार तसेच किनारपट्टीतल्या भागातील लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. व्हेल माशाच्या उलटी संदर्भात प्रशासन, मच्छिमार आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात समज गैरसमज आहेत. आजही व्हेल माशाची उलटी बाबत सत्यता तपासणारी ठोस यंत्रणा नाही किंवा त्या यंत्रणेला मर्यादा आहेत. यामुळे कायद्याचा दुरुपयोग, तसेच तस्करी संदर्भात गोष्टी घडत असतात अशा शक्यता आहेत. अंबर ग्रीस हे स्पर्म व्हेल माशापासून उत्पन्न होते अशी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. स्पर्म व्हेल हा वन्यजीव प्राणी कायदा संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत येत असल्यामुळे त्याची उलटी अथवा शरीरातून उत्सर्जित होणारा पदार्थ हा पण संरक्षित केला गेला आहे. तो संरक्षित असावा की नसावा याबाबत तज्ञांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये मत मतांतरे आहेत. यासाठीच
व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस या पदार्थाचा सखोल आणि शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य, फॉरेस्ट, संशोधन, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तज्ञ लोकांनी एक अभ्यास गट स्थापन केला आहे. सागरी पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले समन्वयक रविकिरण तोरसकर यांची ही संकल्पना असून त्या संदर्भात त्यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

ज्यामध्ये मत्स्य महाविद्यालय चे निवृत्त प्राचार्य डॉक्टर मंगेश शिरधनकर, वनखात्याचे निवृत्त विभागीय वनसंरक्षक अधिकारी श्री सुभाष पुराणिक, सावंतवाडी येथील एसपीके कॉलेजचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर गणेश मर्गज, देवगड महाविद्यालयाचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक नागेश दप्तरदार, वनशक्ती फाउंडेशनचे दयानंद स्टॅलिन मालवण येथील पर्यटन व्यवसायिक आणि विधी अभ्यासक प्रसन्न मयेकर व इतर अभ्यासक मान्यवर यांचा समावेश आहे. या अभ्यास गटाबरोबर भारतातील राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मत्स्य संशोधक केंद्राचे मान्यवर शास्त्रज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. या अभ्यास गटाने केलेला अभ्यास व संकलित केलेली माहिती ही प्रशासनाकडे सुपूर्द केली जाणार असून व्हेल माशाच्या उलटी संदर्भात कायद्यातील तसेच धोरणातील बदल यासाठी त्याचा उपयोग होईल अभ्यास गटाला विश्वास आहे. अभ्यास करताना मच्छिमार पारंपारिक ज्ञानाचा पण वापर केला जाणार आहे .

रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे विविध महाविद्यालयांतील संशोधक व विद्यार्थी यांना या संदर्भात कोणाकडे काही संशोधन, साहित्य अथवा पारंपारिक ज्ञान असेल त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. हा केवळ सार्वजनिक अभ्यास गट असून ही शासकीय समिती नसल्याचेही समन्वयक रविकिरण तोरसकर यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 325

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स