ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
23 ऑक्टोबरला पर्यटन संचनालय महाराष्ट्र आयोजित पर्यटन योजनांचा माहिती देणारा प्रशिक्षण व चर्चासत्र....
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

23 ऑक्टोबरला पर्यटन संचनालय महाराष्ट्र आयोजित पर्यटन योजनांचा माहिती देणारा प्रशिक्षण व चर्चासत्र....

प्रकाशन: 18 Oct 2021 12:21 PM
वाचन संख्या 67

प्रशिक्षण व चर्चासत्र कार्यक्रमाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी लाभ घ्यावा : जिल्हाध्यक्ष श्री. बाबा मोंडकर

मालवण | ब्युरो न्यूज : पर्यटन संचालनालय महाराष्ट्र व सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित विविध पर्यटन योजनांचा माहिती देणारा पर्यटन प्रशिक्षण व चर्चा सत्रांचा उपक्रम 23 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल चिवला बीच मालवण येथे आयोजित केला आहे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रात अग्रेसर करण्याचा सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचा मानस असून यासाठी महासंघा तर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत .सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की नजरेसमोर काय येतं समुद्रकिनारे, समृद्ध निसर्ग, गडकिल्ले ,लोककला ,खळाळते झरे, डोंगरदऱ्या, नारळ पोफळीच्या बागा, नारळ, काजू, फणस, भातशेती; चौमोळी छपराची घरे, वाडी, पानात उकडीचे मोदक, अंबापोळी, सुरमई पापलेट, कोंबडीवडा, कोकम सरबत आणि या सर्वांचा आस्वाद घ्यायला येणारा पर्यटक असे सगळे डोळ्यासमोर उभे राहते. जिल्ह्यात पर्यटन उद्योग हा आघाडीचा उद्योग आहे.शेतकरी, महिला बचत गट, तरुण-तरुणी, होम स्टे, हॉटेल, रिसॉर्ट यांच्या माध्यमातून राहण्या-खाण्याची व फिरण्याच्या सुविधांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन या गोष्टींमुळे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला आहे. या पर्यटन व्यवसायाला एका अधिकृत धोरणांमध्ये समाविष्ट करुन, नव्या जोमाने व उत्साहाने पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटन संचालनालय व सिंधुदुर्ग महासंघाच्यावतीने पर्यटनातील विविध विषयांवर प्रशिक्षण वर्ग कार्यशाळा तसेच चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे.या प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्रांमध्ये जिल्ह्यातील हॉटेल व रिसॉर्ट यांना औद्योगिक दर्जा मिळण्याची कार्यपद्धती तसेच राज्याचे कृषी पर्यटन विकास धोरण आणि बीच सॅक्स धोरण याविषयी माहिती देण्यात येईल तसे यासाठी पर्यटन विभागाच्या संचालनालयाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे उपस्थित राहणार आहेत यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायिकांत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मदत होईल तसेच पर्यटनाच्या विविध संधी ओळखून रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करण्याचा पर्यटन महासंघाचा प्रयत्न आहे. पर्यटन विभागाच्या विविध पर्यटन योजनांची माहिती या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध घटकांना मिळावी म्हणून हा प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्रांचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये पर्यटन संचालनालयाच्या वतीने राज्य पर्यटन प्रशिक्षक श्री मनोज हाडवळे हे कृषी पर्यटनाचे धोरण व कृषी पर्यटनातील संधी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. हा उपक्रम राबवताना पर्यटन संचालनालयाच्या सोबतीने निसर्ग टूर्सचे संजय नाईक हे समन्वयक म्हणून सहभागी असणार आहेत. या प्रशिक्षण व चर्चासत्र उपक्रमाचा लाभ पर्यटन क्षेत्रात काम करत असलेल्या व भविष्यात रोजगाराच्या संधी शोधत असणाऱ्या मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. पर्यटन उपक्रम प्रशिक्षण वर्ग चर्चासत्रासाठी 100 रुपये प्रवेश फी असून प्रथम नावे नोंदविणाऱ्या 50 पर्यटन व्यावसायिकांनाच या चर्चासत्रात भाग घेता येणार आहे अधिक माहिती साठी 9421153035 संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे अशी माहिती सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्हाध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी दिली आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स