वडाचापाट येथे २७ पासून क्रिकेट स्पर्धा.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वडाचापाट येथील नवतरुण मित्रमंडळातर्फे पाताडेवाडी, ब्राह्मणवाडी येथे अंडरआर्म बॉक्स लॉक हॅण्ड नाईट क्रिकेट स्पर्धा २७ ते २९ एप्रिल या कालावधीत होणार आहे. २७ एप्रिल रोजी एक गांव एक संघ, तर २८ व २९ रोजी खुली क्रिकेट स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघाला अनुक्रमे ८०२४, ४०२४, २०२४ रुपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी सचिन पाताडे – ९५०५४९७५३६, दिनेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)