ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिरगांव हायस्कूल येथे महिलांकरिता मोफत आरोग्य शिबीर संपन्न ; २७५ महिलांनी घेतला लाभ.

शिरगांव हायस्कूल येथे महिलांकरिता मोफत आरोग्य शिबीर संपन्न ; २७५ महिलांनी घेतला लाभ.

प्रकाशन: 21 Apr 2024 01:44 PM
वाचन संख्या 410

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या
देवगड तालुक्यातील शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई , राजे ग्रुप , मित्र शिरगांव, आर. के. फाऊंडेशन यांच्या सौजन्याने सखी एक निरामय जीवन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत उमंग चाईल्ड ट्रस्ट भांडुप, मुंबई आयोजित महिलांकरिता भव्य मोफत आरोग्य शिबीर शिरगांव हायस्कूल येथे १९ एप्रिल रोजी संपन्न झाले. सुमारे २७५ महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराचे उद्घघाटन शिरगांव हायस्कूल स्कूल कमिटी चेअरमन राजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिरगाव हायस्कूल चे प्राचार्य शमशुद्दिन अत्तार , संदीप साटम, माजी सरपंच अमित साटम, मंगेश लोके, रावराणे, ग्रा. पं. सदस्या सौ. स्वाती साटम, शीतल तावडे, वैष्णवी आईर, मयुरी चौकेकर, धनराज पारधी, युधिराज राणे, महेश शिरोडकर, दीपक कदम, जशिथ साटम आदी मान्यवर उपस्थित होते. ३० ते ६० वयोगटातील सुमारे २७५ महिलांनी आरोग्य तपासणी केली. यात कंप्लीट ब्लड काऊंट ( CBC ) हिमोग्लोबिन, डायबेटिज, थायरॉईड ( T३, T ४, TSH ), व्हिटॅमिन D ३, ब्रेस्ट कॅन्सर ( मेमोग्राफी ) आदी तपासणी तज्ञ डॉक्टर यांच्याकडून करण्यात आली. तपासणी केलेल्या सर्व महिलांना पोषण किट ( वस्तू ) मोफत देण्यात आल्या.

या शिबिराला उमंग चाईल्ड ट्रस्ट च्या संचालिका सौ. अश्विनी कराडे, सल्लागार अब्दुल बेंग, भारत पेट्रोलियम चे अधिकारी रवी कदम, अनोलोजिस्ट डॉ. अनिल हेरुर, एमडी पॅथोलॉजिस्ट डॉ. जयंत मांडोत, डॉ. स्वप्नील विसपुते, तंत्रज्ञ शुभांगी कोरगावकर, प्रतीक्षा सकपाळ आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स