शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेश वाळके कालवश.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेश भालचंद्र वाळके ( वय ५२ रा. शिवडाव मांगरवाडी.) यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
दिवंगत श्री. राजेश वाळके हे शिस्तप्रीय तसेच कलाप्रीय आणि मनमिळावू होते. त्यांच्या निधनाने शिवडाव गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. विद्यार्थी वर्गातून त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पुतण्या, विवाहित दोन पुतणी, भावजय असा मोठा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)