सौरभ ताम्हणकर आणि रोहन पेंडुरकर व सहकारी कार्यकर्ते यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त केले स्मृतीस अभिवादन.
मालवण | प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आज मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व रोहन पेंडुरकर यांच्या सहित अन्य सहकारी व भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, फ्रान्सिस फेर्नांडीस, रोहन पेंडुरकर, नितेश पेंडुरकर, राहुल पेंडुरकर, अमित जाधव, महेश जाधव, भूषण मालवणकर, जाधव व अन्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)