ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजकपदी सौ. संगीता महाडिक.

वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजकपदी सौ. संगीता महाडिक.

प्रकाशन: 13 Apr 2024 04:43 AM
वाचन संख्या 87

पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केली निवड.

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्ह्याच्या शाश्वत नियोजनबद्ध पर्यटन विकासासाठी कार्यरत आहे आणि वैद्यकीय पर्यटन क्षेत्रातही पर्यटन महासंघ पुढाकार घेणार असून जिल्ह्याला वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात एक वेगळी ओळख मिळवून देण्याचा मानस पर्यटन महासंघाचा असून यासाठी वैद्यकीय पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक म्हणून सौ संगीता महाडिक यांची निवड पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांजकडून करण्यात आली. उपसंचालक पर्यटन संचानालय कोकण विभाग ह्यांचा यांच्या हस्ते सौ संगीता महाडिक यांचा सत्कार करून त्यांना जबाबदारी देण्यात आली. सौ. संगीता महाडिक या आजोळ, ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय पर्यटन व सेवा केंद्र , नेरुर, कुडाळ सिंधुदुर्ग च्या संचालक असून त्यांनी पर्यटन महासंघाने दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आठही तालुक्यात वैद्यकीय पर्यटन वाढीसाठी आपण काम करणार असल्याचा मानस व्यक्त केला. यावेळी श्री. रविकिरण उर्फ विकी तोरसकर, श्री मंगेश जावकर, सौ. अन्वेषा आचरेकर आणि अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स