ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग व गुरुवर्य समूहाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग व गुरुवर्य समूहाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन.

प्रकाशन: 13 Apr 2024 05:01 PM
वाचन संख्या 198

शिरगांव | संतोष साळसकर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग व गुरुवर्य समुहाच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मार्गदर्शन वर्गात इयत्ता ४ थी व ५ वी मधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. अनुभवी तज्ञ मार्गदर्शकांद्वारे व्यावसायिक अँपद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. दर आठवड्याला विद्यार्थ्यांच्या शंकचे समाधान तसेच मार्गदर्शक व्हिडीओ सोयीनुसार केव्हाही बघता येणार आहेत. स्पर्धा परीक्षेवरील विविध साहित्य pdf स्वरूपात ॲप वर उपलब्ध केले जाणार आहे. संपूर्ण वर्षभर मार्गदर्शनाबरोबर प्रत्येक घटकावर सराव प्रश्नपत्रिका, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन कार्यशाळा, शेवटच्या दोन महिन्यात प्रश्नपत्रिका सराव असे या मार्गदर्शन वर्गाचे स्वरूप आहे.

या मार्गदर्शन वर्गात साहभागी होण्यासाठी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री गणेश नाईक ९८६०२५२८२५, कार्यवाह सुनिल करडे ८४८४००३३९९ यांच्याशी संपर्क साधावा असे शिक्षक परिषदेमार्फत आवाहन करण्यात आलेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स